तेली समाज तेलघाणा

Teli samaj

       वनस्पतिजन्य पदार्थांपासून तेलाची निर्मीती  : दाबाच्या योगाने तेलाची निर्मीती  : भुईमूग, तीळ, करडई इत्यादींच्या बियांपासून तेल काढण्यासाठी दगडी घाण्याचा उपयोग पूर्वापार तेली समाजा कडुन भारतात चालत आलेला आहे. या तेल  घाण्यात एक दगडी उखळी असून तीमध्ये एक वजनदार लाकडी दांडा (लाट) बैलाच्या शक्तीने फिरविला जातो. उखळीत तेलबिया घातल्या म्हणजे लाटेच्या दाबाने त्या चिरडल्या जाऊन त्यामधील तेल बाहेर पडते. नंतर लाट बाहेर काढून उखळीतील तेल, त्यात तेल, त्यात कापड बुडवून व ते बाहेर काढून पिळून मिळवितात. या घाणीचा एक सुधारलेला प्रकार म्हणजे कोलू घाणी. या घाणीची उखळी लाकडी असून तिच्या बुडाला एक भोक ठेवलेले असते. त्यातून तेल बाहेर पडते त्यामुळे लाट बाहेर काढणे व कापडाने तेल शोषण करून घेणे हे श्रम वाचतात. यातील लाटेला बोजापाट लावून त्यावर वजने ठेवतात. त्यामुळे दाबात वाढ होऊन तेलाचा उताराही वाढतो. महाराष्ट्र शासनाने नि‍विन तयार केलेल्या नव्या तेल घाणीत उखळी काँक्रिटची बनविलेली असून बोजापाट लाटेच्या माथ्यावर लोंबता ठेवलेला आहे. या योजनेमुळे घर्षणामुळे वाया जाणारी बैलाची शक्ती वाचते व शिवाय जास्त दाब उपलब्ध होऊन तेलाचे प्रमाणही वाढते. या तेल घाण्‍याचा वापर तेली समाज गेली हजारो वर्षे  करित आहे. यात गोलक धारवे (बॉल बेअरिंग्ज) वापरले असल्यामुळे ही चालविण्यास हलकी असते. एका बैलाच्या शक्तीने ८ तासात दगडी घाणीने ४० किग्रॅ. कोलू घाणीने ४८ किग्रॅ. व नव्या घाणीने ९० किग्रॅ. तेलबियांचे तेल काढता येते. लाट फिरविण्यासाठी या घाणीत डीझेल एंजिन किंवा विद्युत शक्तीही वापरता येते.

Maratha teli, Rathore Teli, Kshatriya teli, Jairat Teli, Tilwan Teli, Rathod Teli, Rathore Teli, Savji Teli, Tirmal Teli, Ek baili, Erandel Teli, Don baili Teli, Sahu Teli, Vaddhar Teli, Tarhan Teli, Moodi Teli, konkani Teli, Lingayat Teli, veerashaiva lingayat teli, Bathari Teli, Rajput Teli, Sahu teli samaj, Unai Sahu teli samaj, GANIGA, Gandla, Ghanchi teli samaj,  Vaniya chettiar, chettiar, Ganiga Shetty, Jyothipana Ganiga, Ontettu Ganiga, Somakshatriya Ganiga, Jodettu Ganiga, Veerashaiva Ganiga and  other

मराठा तेली,  राठोड  तेली, क्षत्रिय तेली, जिरायत तेली, तिळवण  तेली, सावजी तेली, तिरतल तेली, एक बैल तेली, एरंडेल तेली, दोन  बैल तेली, साहु तेली, मोदी तेली, कोकणी तेेली अथवा कोकणस्‍थ तेली, लिंगायत तेली, विरशैव लिंगायत तेली, रजपुत तेली,  उनई साहू तेली, दशकर तेली, साव तेली

दिनांक 14-03-2017 17:42:53
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
Facebook Tweet Google+
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com