जालना सकल तेली समाजाचा मूकमोर्चा

              जालना : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणारया संशयितांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सोमवारी सकल तेली समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेक-यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना दिले. सकाळी अकराच्या सुमारास शासकीय विश्रामगृहासमोरून या मोर्चास सुरुवात झाली. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालया समोर पोहचल्यानंतर पोलिसांनी मोर्चे कंयांना मुख्य प्रवेशद्वारावरच रोखले. या वेळी सकल तेजी समाजाच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची भेट घेवून निवेदन दिले. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे पाच वर्षाच्या बालिकेवर एका संशयितांने अत्याचार केला. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, यामुळे समस्त तेली समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. समाजातील अशा विकृती नष्ट करण्यासाठी या घटनेतील दोषीवर कोपर्डी प्रमाणे जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी, तसेच पीडितेच्या आई-वडिलांना धाक दाखवून प्रकरण मिटविणा-यांवरही कारवाई करावी, अशी मागण केली. निवेदनावर तेली समाजाचे लक्ष्मीकांत पांगारकर, राजेश नरवैय्ये, विश्वनाथ क्षीरसागर, पद्मनाथ क्षीरसागर, राजेंद्र वाघमारे, सुनंदा अबोले, संजय चौधरी, अनिल व्यवहारे, कैलास सोनवणे, बाबुराव भवर, रामराव गडगिळे, प्रभाकर गडगिळे, प्रमोद गडगिळे, कृष्णा ठोंबरे, योगेश गडगिळे, राहुल धारकर, कैलास बुजाडे, अशोक पांगारकर, दत्ता भवर मनोज मालोदे, मनोज गडगिळे, संजय राऊत, गणेशराव शिंदे, अर्जुन मालोदे, पवन मालोदे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

Sakal Teli Samaj Jalna Muk Morcha

दिनांक 27-02-2018 22:48:11
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©